समतोल..

नुकतंच डेसिग्नेटेड सर्वायव्हर हा अमेरिकन टिव्ही शो पाहिला. त्यातलं एक जोडपं आणि त्याची कथा मनात अजूनही घोळतेय.  ॲरन आणि इसाबेल, मेक्सिकन, दोघेही व्हाईट हाऊस मध्ये काम करत असतात. ॲरन हा प्रेसिडेंटच्या अगदी जवळचा, विश्वासातला माणूस, त्याचा नॅशनल सिक्योरिटी हेड आणि इसाबेल तेथेच एका पदावर काम करतेय. ॲरन अत्यंत हुशार, देखणा आणि महत्त्वाकांक्षी तर इसाबेल साधी, सरळ, स्पष्टवक्ती, मेहनती आणि कामाशी […]

लँड ऑफ आईस अँड फायर – आइसलँड

पृथ्वी! पृथ्वी एक रहस्य आहे. ह्या धरणीची रचना करताना त्यात अनेक रंग भरणारा तो कर्ता माझ्या करता नेहमीच एक मोठं रहस्य राहिला आहे. इथे निसर्गकृपेने घडणाऱ्या सगळ्या हालचाली, सगळे बदल आपण  बघत असतो. फिरतं ऋतुचक्र, चंद्राच्या बदलत्या कला, सूर्याचे बदलते कल, वाऱ्याच्या विशिष्ट दिशा, दरीखोऱ्यांमधून वाहणारे, सळसळणारे धबधबे, नद्या,  उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वत आणि भुतलातील हालचालींमुळे त्यात होणारे बदल, समुद्राचे कधी रौद्र […]

कालनिर्णय

कालनिर्णयच्या मागंच पान….. भिंतीवरी कालनिर्णय असावे…..!!मला वाटतं कळायला लागल्यापासून किंवा अगदी त्याही आधी, अगदी आईच्या पोटात असताना कानावर पडणाऱ्या अनेक नावांपैकी एक म्हणजे कालनिर्णय!! आपली नाळ जितकी आपल्या संस्कृतीशी जोडली आहे तितकीच त्या संस्कृतीच्या प्रत्येक प्रतिकाशी जोडल्या गेली आहे. त्यातलंच एक म्हणजे कालनिर्णय! आता लिहिताना, म्हणजे टाईप करताना बघतेय तर ‘काल’ टाईप केल्यावर लगेच ‘कालनिर्णय’ सजेशन्स मध्ये येतंय, अगदी असच […]

error: Content is protected !!