दृष्टी

सकाळी उठल्या उठल्या रेवतीने पलंगाच्या बाजूला असलेला टेबल चाचपडला  ते हाताला बांगड्या लागतील म्हणून; पण टेबल रिकामाच. आणि तिच्या लक्षात आलं की महिना झाला हातात बांगड्या घातल्याच कुठे? आणि ह्या विचारानीच तिला रडू कोसळले.रेवतीला बांगड्याचं प्रचंड वेड. लग्नानंतर तर हिरव्या बांगड्या तिच्या हातात नेहमीच असायच्या. तसा हिरवा रंगही तिचा आवडताच. कपाट सगळ्या हिरव्या शेडस् नी भरलेलं. प्रत्येक वेळी दुकानातून एक […]

अन्नपूर्णा

राधाबाईंना जाऊन जेमतेम १५ दिवस झाले असतील अन् व्यंकटेशरावांची तब्येत ढासळली. राधाबाई गेल्या पासून त्यांची खाण्यावरची वासनाच उडाली होती. सहाजिकच होतं. त्यांची आई गेल्यापासून त्यांनी मिळेल तसं खाल्लं. अन्नाला नावे ठेऊ नये ह्या आईच्या एका वाक्या खातर त्यांनी 8 वर्ष मिळेल तसं आणि ते खाल्लं. वयाच्या २३ व्या वर्षी राधाबाईंशी त्यांचा विवाह झाला अन् जोश्यांचा घराला अन्नपूर्णा प्रसन्न झाली. १८ […]

स्पर्श

रणरणत्या दुपारी आप्पासाहेब भरभर पावलं टाकत घराबाहेर पडले आणि त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसकडे मोर्चा वळवला. मनात असंख्य विचार… “कुणाचं असेल? मला का बोलवंल? आजकालचे पोस्टमन मेले आळशी झालेत. माझंच पार्सल घ्यायला मला बोलवलं..आणून नाही देता येत घरी? पण रघू काम करायचा तिथे? एवढ्यात कसा रिटायर झाला? का काही अपघात वगैरे?”आप्पांच्या घराजवळचं एकच पोस्ट ऑफिस. तिथे काम करणारे लोकंही आता ओळखीचे […]

आज तुम्हे एक ख़त लिखना है!

पूर्वीच्या काळी…हो पूर्वीच्याच म्हणेल.. तर पूर्वीच्या काळी पत्र लिहिली जायची. पत्र.. म्हणजे सगळं कळवण्याचं आणि कळण्याचं एकमव माध्यम. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तिचं पत्र येणं.. अहाहा.. काय भावना असेल ती.. आपण मुकतोय त्या एका भावनेला..आता तस म्हणायला गेलं तर ह्या भ्रमणध्वनीवर येणारे संदेशही हे अहाहा वगरे वाटण्याकरता पुरेसे असते जर त्यात;“काय करतेय?’ ‘जे1 झाल का?’जानू, बेबी, शोना, पिल्लू‘ह्म्म ‘‘येताना 2 किलो कांदे, […]

ए शादी तेरे नाम के चर्चे बहुत है!

तसं पहायला गेलं तर लग्न म्हणजे दो दिलो का मिलन, दोन कुटूंबांच एक होणं, मुला मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस वगैरे वगैरे वगैरे.. पण लग्नाच्या ह्या सोहळ्यात खरंच नवरा – नवरी महत्वाचे असतात का??तर नाही…. लग्नाच्या दिवशी मैं इस कहानी का हीरो किंवा मैं इस कहानी की हीरोइन हे फक्त नवरा – नवरीलाच वाटायला हवं.. हो ना! पण नाही… लग्नात आलेल्या […]

#societyenough

#MeToo, काही दिवसांपूर्वी एका मुलींनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिग छळाला वाचा फोडताना #MeToo ह्या शब्दांचा वापर केला आणि सगळ्या मुलींना स्त्रियांना आवाहन केले की आपल्या सोबत होणाऱ्या ह्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहा, बोला, मोकळेपणानी बोला, सहन करू नका. तिच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य स्त्रियांनी, मुलींनी आपल्या सोशल मीडिया वर #MeToo लिहून कुठे तरी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. काहींनी तो अनुभव व्यक्त […]

सखी

टीव्ही वर कॉमेडी नाईट्स बघत राहुल आणि योगिनी आपल्या शनिवारची संध्याकाळ घालवत होते. हसून लोटपोट होणाऱ्या राहुलची नजर बऱ्याच वेळाने अस्वस्थ योगिनी कडे गेली. त्यांची एकुलती एक मुलगी, तिच्या वयाच्या १० व्या वर्षी नाईट आऊट ला गेली होती; गेली होती तिच्या मैत्रीणीकडेच पण तरीही रात्री मुलींनी घराबाहेर राहणं म्हणजे आजकाल सुरक्षित नाही हे जाणून होती योगिनी! तिला पाहून न राहवून राहुल ओरडला,”अरे […]

समतोल..

नुकतंच डेसिग्नेटेड सर्वायव्हर हा अमेरिकन टिव्ही शो पाहिला. त्यातलं एक जोडपं आणि त्याची कथा मनात अजूनही घोळतेय.  ॲरन आणि इसाबेल, मेक्सिकन, दोघेही व्हाईट हाऊस मध्ये काम करत असतात. ॲरन हा प्रेसिडेंटच्या अगदी जवळचा, विश्वासातला माणूस, त्याचा नॅशनल सिक्योरिटी हेड आणि इसाबेल तेथेच एका पदावर काम करतेय. ॲरन अत्यंत हुशार, देखणा आणि महत्त्वाकांक्षी तर इसाबेल साधी, सरळ, स्पष्टवक्ती, मेहनती आणि कामाशी […]

लँड ऑफ आईस अँड फायर – आइसलँड

पृथ्वी! पृथ्वी एक रहस्य आहे. ह्या धरणीची रचना करताना त्यात अनेक रंग भरणारा तो कर्ता माझ्या करता नेहमीच एक मोठं रहस्य राहिला आहे. इथे निसर्गकृपेने घडणाऱ्या सगळ्या हालचाली, सगळे बदल आपण  बघत असतो. फिरतं ऋतुचक्र, चंद्राच्या बदलत्या कला, सूर्याचे बदलते कल, वाऱ्याच्या विशिष्ट दिशा, दरीखोऱ्यांमधून वाहणारे, सळसळणारे धबधबे, नद्या,  उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वत आणि भुतलातील हालचालींमुळे त्यात होणारे बदल, समुद्राचे कधी रौद्र […]

कालनिर्णय

कालनिर्णयच्या मागंच पान….. भिंतीवरी कालनिर्णय असावे…..!!मला वाटतं कळायला लागल्यापासून किंवा अगदी त्याही आधी, अगदी आईच्या पोटात असताना कानावर पडणाऱ्या अनेक नावांपैकी एक म्हणजे कालनिर्णय!! आपली नाळ जितकी आपल्या संस्कृतीशी जोडली आहे तितकीच त्या संस्कृतीच्या प्रत्येक प्रतिकाशी जोडल्या गेली आहे. त्यातलंच एक म्हणजे कालनिर्णय! आता लिहिताना, म्हणजे टाईप करताना बघतेय तर ‘काल’ टाईप केल्यावर लगेच ‘कालनिर्णय’ सजेशन्स मध्ये येतंय, अगदी असच […]

error: Content is protected !!