अलक मातृदिन

#अलक काही मातृदिन असेही… “आज बोलायचंच नाही! कामही करणार नाही, स्वयंपाकही नाही…नाही स्वयंपाकघरात तर जाणारच नाही मी! घरी सगळेच राहणार, खाणार सगळेच, पसारा सगळेच करणार पण आवरायचा मीच. नास्ता करा, स्वयंपाक करा, जेवण झाल्यावर भांडी घासा, मेला हा कोरोना पण जात नाही. चांगलं मदतीला मावशी होत्या…” ह्या सगळ्या विचारांशी तिची लढाई सुरू होती ती बेडरूम मधल्या रजईत… पण शेवटी घरकाम […]

गुंता

कधी तरी एखादा गुंता नकोश्या नात्यांचाही बांधल्या जातो. नको असतं ते रखडणं तरी सोडवत नाही. एखाद्या रुक्ष दोऱ्याचं कसं होतं; ताणला की गाठं आणखीनच जास्त घट्ट होत जाते, रुतायला लागते, पिळ पडतो, पण सुटतही नाही आणि तुटतही नाही. कात्री घेऊन सोडवायचं तरी गाठ सुटणारी नसते.  बारीक गाठ, घट्ट बसलेली असते नेहमी करता… दोरा कापला तर उरलेला दोरा, कितीही का असेना […]

घर का भेदी

बबन्या गावातला द्वाड मुलगा!! खोड्या काढणारा, कुणाला न जुमानणारा, अतिशय आगाऊ मुलगा! त्याची बोलती जर कुणासमोर बंद होत असेल तर आईसमोर, बाकी बापालाही तसा तो जुमानत नव्हताच.  मग बाप मात्र त्याला चांगलाच लाथाडायचा.  बबन्याच्या करामतीही तशीच असायच्या.कधी गावातल्या लोकांना त्रास दे, कधी बायकांची मजा उडव, कधी येणाऱ्या जाणाऱ्यांना वाकड बोल, तर कधी मुलींना उगाच त्रास दे; त्याचे हे थेर पाहून […]

क्षण

तल्लीन होता आलं पाहिजेदंग होता आलं पाहिजेएकरुप होता आलं पाहिजेकशाशी तरी…आपण असतोच आपल्यासाठी…. पण एकटे मात्र कधीच नसतो.. सतत काही तरी मागे पुढे असतं आपल्या… मग मागच्या आठवणीत अन् समोरच्या आशेत झुरत बसतो आपण.. काही चुकलेलं, सुटलेलं पूर्ण करायच्या नादात उद्याचं सगळं ठरवतो… कालच्या विचारानी उद्याचं ठरवायचा नादच लागून जातो.. अन् ह्या नादात आहे त्याच्याशी एकरुप व्हायचं राहून जातं…एखादं गाणं […]

राकट देशा कणखर देशा

एखाद्या वेळी घरी अचानक पाहुणे येतात. रविवारचा दिवस असतो, आईची तरिही घाई सुरू असते, बाबांचा पेपर, मुलांचं रेंगाळणं, आजी – आजोबा आपल्या दैनंदिन कामकाजात मग्न. तेव्हढ्यात अचानक पाहुण्यांचा फोन, “आहात ना घरी, जवळपासच आलो होतो, पाच मिनिटात पोहचू”झालं, तारांबळ…. “घरात आज वाण सामान येणार होतं, तसं थोडं आहे भरलेलं; स्वच्छता?? अरे देवा, आज जाळी काढायचं ठरवलं होतं, न्हाणीघराची साफ सफाई, […]

जागतिक पुस्तक दिवस.

हाथ में आ जाती हैंतो बोल पडती हैं किताबेंआँखों से गुजरकरहोंठों पर मुस्कान लातीहै किताबें पुस्तकांचं वेड असतं.. ते लागतंच.. बस थोडा दिल और दिमाग उसके हवालें कर दो.. और फिर देखो..पुस्तकांना सगळेच मित्राची उपमा देतात.. आणि ते खरं ही आहेच.. जेंव्हा कुणी सोबत नसतं तेंव्हा पुस्तकं कमालीची साथ देतात.. हे मला जरा उशीराच कळलं.. भारतात असतांना माझ्या आजूबाजूला चालते […]

सर कुणाची…

कधीतरी खूप भिजावसं वाटतं, अगदी चिंब आणि भरूनही आलेलं असतं बाहेर.. काळोख दाटलेला असताना आपण दूर दूर बघत उभे असतो खिडकीत, दिसत असतं त्या भरून आलेल्या ढगांचं वाहणं. मग एखाद्या ठिकाणी दूरवर, एखादा ढग रिता होतांना दिसतो अन् त्या ढगांमधून कोसळणाऱ्या सरी बघतांना त्यात भिजणारी, आपल्या पासुन लांब असलेली ‘ती’ जागा, कुठली माहीत नाही, पण आपल्याच जमिनीशी जोडल्या गेलेला कुठला […]

कडुलिंबाची गोडी..

लहानपणी गुढीपाडव्याला माझी माई आजी मोठा काळा खलबत्ता घेऊन बसायची. त्यात मिरे, जिरे, खडा हिंग, गूळ, थोडं काळं मिठ, चिंच आणि घरच्याच कडुलिंबाची कोवळी कोवळी; पोपटी रंगाची पानं घेऊन कुटत बसायची. त्याची काळपट गोळी बनवून ती वाटीत तयार ठेवायची. गुढी उभारून झाली की पहिला प्रसाद ह्या गोळीचा!! सुरवातीला वाटायचं, “छी.. समोर पेढा, शेवयाची खीर असताना ही गोळी का??” पण मग […]

श्रवणीय

बर्‍याच वर्षांनी देशपांडे कुटूंब गावी आलं. अमेरिकेतून आले की मुंबईत राहून लगेच परतीचा प्रवास असायचा. गावी चुलत घराणं होतं, पण फोनवरच काय तो संपर्क साधला  जायचा. पण ह्या वर्षी मात्र सगळेच गावी आले, त्यात ह्यावेळी सोबत आदित्यही. आदित्य देशपांडे, वय वर्ष 17, ह्याची बर्‍याच वर्षानंतरची ही गावाकडे चक्कर. बाॅर्न अँड ब्राॅट अप अमेरिका, समजुतदार, आपल्या मूळ ओळखून असणारा पण तरिही […]

गंध

आज सकाळ पासून मन जरा अस्वस्थच होतं. खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी ती आज आतून वादळासारखी होती मात्र वरून अगदीच शांत भासत होती. वादळ आतल्याआत शमवण्याची तिची ताकदही अफाट होती.. असं आज होत नव्हतं, कित्येकदा हे वादळ तिच्या मनात घोंगावत असे, पण बाजूला बसलेल्याला कळेल तर नवलच. पण मग ती लगेच खुलायचीही. एखादं गाणं ऐकून किंवा आवडीचं पुस्तक वाचून किंवा एखाद्या विचारानी […]

error: Content is protected !!