टॅक्सी

माणूस कित्येकदा विनाकारण तडजोड करत बसतो. मान्य आहे, तडजोड भाग आहे आयुष्याचा! काही जण म्हणतील तडजोड ही यशस्वी आयुष्याची गुरूकिल्लीच आहे.आहे त्यात आनंद बघावा आणि जे नाही पटत त्याच्याशी जुळवून घ्यावं. हो, घ्यावं जुळवून, पण किती?? एकदा तरी ह्या तडजोडीला बगल द्यावीच.. देऊनच पहावी.. जर ही तडजोड जीवनावश्यक नसेल तर एकदा तरी त्या व्यतिरिक्त वेगळा विचार करुनच पहावा.बरेचदा खूप काही […]

कन्या दिवस

काल कन्या दिवस झाला! मुली खरोखरच घराला घरपण देतात, हे एका मुलीची मोठी बहीण, हो मुलीचीच आणि आता आई झाल्यावर कळलं.मी सहावीत असताना, माझ्या सगळ्यात लहान बहिणीचा (आधी सांगितल्याप्रमाणेच आमच्यात ते कझिन बिझिन नसतं, ते जगासाठी) जन्म झाला आणि आपसूकच माझ्यात तिच्यासाठी मोठ्या बहिणीच्या भावना जागृत झाल्या. तिच्या सोबत मी वेळही सगळ्यात जास्त घालवला, त्यामुळेच की काय आमचं सूत्र चांगलंच […]

जग बदलतंय!!

काल दहावीचा निकाल लागला. माझ्या भाचीला 96.20% मार्कस् मिळालेत. तिच्या शाळेत तिचा दुसरा नंबर! आमच्या पुढच्या पिढीचं हे पाऊल पुढे पडतांना, एक नवा बदल देखील घडतांना दिसतोय. माझ्या नंतर कित्येक वर्षांनी आमच्या घरात, माझ्या आत्ये बहिणीची मुलगी याज्ञश्रीचा काल दहावीचा निकाल लागला आणि पोरीनी नंबरस् सुद्धा मस्त मिळवले. खूप अभिमानास्पद आहे हे! पण याही पेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे […]

झूम

आज सहज फेसबुक व्हिडिओ स्क्रोल करताना भाडिपा ह्या चॅनल वर झूम नावाची वेबसिरीज दिसली. पाच भागांची सिरीज! बनवली का? तर प्रॉडक्ट प्लेसमेंट!!बिरा नावाच्या बिअरची ॲड करायला ह्यांनी ही वेबसिरीज बनवली. बरंय, मराठी माणसाला स्पॉन्सर मिळतोय! पण, ह्याच्या पहिल्याच भागात, आई – वडील आजोबांच्या श्राद्धाच्या पानावर बिअर आणून ठेवतात. ठिक आहे, आजोबांना आवडत असावी बिअर. मग नंतर मुलगा (नायक), सिगरेट पित […]

राकट देशा कणखर देशा

एखाद्या वेळी घरी अचानक पाहुणे येतात. रविवारचा दिवस असतो, आईची तरिही घाई सुरू असते, बाबांचा पेपर, मुलांचं रेंगाळणं, आजी – आजोबा आपल्या दैनंदिन कामकाजात मग्न. तेव्हढ्यात अचानक पाहुण्यांचा फोन, “आहात ना घरी, जवळपासच आलो होतो, पाच मिनिटात पोहचू”झालं, तारांबळ…. “घरात आज वाण सामान येणार होतं, तसं थोडं आहे भरलेलं; स्वच्छता?? अरे देवा, आज जाळी काढायचं ठरवलं होतं, न्हाणीघराची साफ सफाई, […]

कडुलिंबाची गोडी..

लहानपणी गुढीपाडव्याला माझी माई आजी मोठा काळा खलबत्ता घेऊन बसायची. त्यात मिरे, जिरे, खडा हिंग, गूळ, थोडं काळं मिठ, चिंच आणि घरच्याच कडुलिंबाची कोवळी कोवळी; पोपटी रंगाची पानं घेऊन कुटत बसायची. त्याची काळपट गोळी बनवून ती वाटीत तयार ठेवायची. गुढी उभारून झाली की पहिला प्रसाद ह्या गोळीचा!! सुरवातीला वाटायचं, “छी.. समोर पेढा, शेवयाची खीर असताना ही गोळी का??” पण मग […]

ए शादी तेरे नाम के चर्चे बहुत है!

तसं पहायला गेलं तर लग्न म्हणजे दो दिलो का मिलन, दोन कुटूंबांच एक होणं, मुला मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस वगैरे वगैरे वगैरे.. पण लग्नाच्या ह्या सोहळ्यात खरंच नवरा – नवरी महत्वाचे असतात का??तर नाही…. लग्नाच्या दिवशी मैं इस कहानी का हीरो किंवा मैं इस कहानी की हीरोइन हे फक्त नवरा – नवरीलाच वाटायला हवं.. हो ना! पण नाही… लग्नात आलेल्या […]

#societyenough

#MeToo, काही दिवसांपूर्वी एका मुलींनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिग छळाला वाचा फोडताना #MeToo ह्या शब्दांचा वापर केला आणि सगळ्या मुलींना स्त्रियांना आवाहन केले की आपल्या सोबत होणाऱ्या ह्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहा, बोला, मोकळेपणानी बोला, सहन करू नका. तिच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य स्त्रियांनी, मुलींनी आपल्या सोशल मीडिया वर #MeToo लिहून कुठे तरी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. काहींनी तो अनुभव व्यक्त […]

सखी

टीव्ही वर कॉमेडी नाईट्स बघत राहुल आणि योगिनी आपल्या शनिवारची संध्याकाळ घालवत होते. हसून लोटपोट होणाऱ्या राहुलची नजर बऱ्याच वेळाने अस्वस्थ योगिनी कडे गेली. त्यांची एकुलती एक मुलगी, तिच्या वयाच्या १० व्या वर्षी नाईट आऊट ला गेली होती; गेली होती तिच्या मैत्रीणीकडेच पण तरीही रात्री मुलींनी घराबाहेर राहणं म्हणजे आजकाल सुरक्षित नाही हे जाणून होती योगिनी! तिला पाहून न राहवून राहुल ओरडला,”अरे […]

समतोल..

नुकतंच डेसिग्नेटेड सर्वायव्हर हा अमेरिकन टिव्ही शो पाहिला. त्यातलं एक जोडपं आणि त्याची कथा मनात अजूनही घोळतेय.  ॲरन आणि इसाबेल, मेक्सिकन, दोघेही व्हाईट हाऊस मध्ये काम करत असतात. ॲरन हा प्रेसिडेंटच्या अगदी जवळचा, विश्वासातला माणूस, त्याचा नॅशनल सिक्योरिटी हेड आणि इसाबेल तेथेच एका पदावर काम करतेय. ॲरन अत्यंत हुशार, देखणा आणि महत्त्वाकांक्षी तर इसाबेल साधी, सरळ, स्पष्टवक्ती, मेहनती आणि कामाशी […]

error: Content is protected !!