हक्काचं अतिक्रमण

एखादी जागी असते, अशीच, कुणाच्या तरी मालकीची (किंवा मालकी नसलेली ही) ज्यावर कुणीही अधिकार गाजवणारं नसतं.मग अचानक कुणीतरी येऊन तिथे अतिक्रमण करतं, आपलं बस्तान बसवत . खरं तर ती जागा त्या आलेल्या व्यक्तीची नसतेच पण तो येतो… अगदी जबरदस्तीच.. किंवा नकळत आपलं स्थान तिथे निर्माण करतो; आपलं बस्तान बसवतो आणि मग जशी काही ती जागा त्याचीच होऊन जाते.. त्या जागेलाही […]

टॅक्सी

माणूस कित्येकदा विनाकारण तडजोड करत बसतो. मान्य आहे, तडजोड भाग आहे आयुष्याचा! काही जण म्हणतील तडजोड ही यशस्वी आयुष्याची गुरूकिल्लीच आहे.आहे त्यात आनंद बघावा आणि जे नाही पटत त्याच्याशी जुळवून घ्यावं. हो, घ्यावं जुळवून, पण किती?? एकदा तरी ह्या तडजोडीला बगल द्यावीच.. देऊनच पहावी.. जर ही तडजोड जीवनावश्यक नसेल तर एकदा तरी त्या व्यतिरिक्त वेगळा विचार करुनच पहावा.बरेचदा खूप काही […]

कन्या दिवस

काल कन्या दिवस झाला! मुली खरोखरच घराला घरपण देतात, हे एका मुलीची मोठी बहीण, हो मुलीचीच आणि आता आई झाल्यावर कळलं.मी सहावीत असताना, माझ्या सगळ्यात लहान बहिणीचा (आधी सांगितल्याप्रमाणेच आमच्यात ते कझिन बिझिन नसतं, ते जगासाठी) जन्म झाला आणि आपसूकच माझ्यात तिच्यासाठी मोठ्या बहिणीच्या भावना जागृत झाल्या. तिच्या सोबत मी वेळही सगळ्यात जास्त घालवला, त्यामुळेच की काय आमचं सूत्र चांगलंच […]

कृष्ण

कृष्ण म्हंटल की मन वेडं होतंच!मन धावत जातं त्याच्या मागे; रानावनात, नदी काठी, दर्‍या- खोर्‍यांतून, तो जाईल तिथे; मन वेड्यासारखं धावत जातं. त्याचं अस्तित्व जाणवेल ह्या एका आशेवर मन धावत जातं, शोधत राहतं कृष्णाला! आणि तो भेटतोच… प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत, वेदनेत, आनंदात, दुःखात, प्रेमात, विरहात सगळी कडे तो भेटतोच. साथ देत राहतो प्रत्येक वेळी.हातात हात घेतो आणि घेऊन जातो […]

पैलतीरावर

बरेचदा आपण फक्त प्रश्नच घेऊन जगत असतो. हे असं का झालं? तसं का नाही झालं? किंवा भविष्यात असं होईल ना? नाही झालं तर मी काय करू?पण आजचा विचार कुठेच नसतो.. ह्या न बदलता येणाऱ्या भूतापायी आणि आजच आपण घडवू शकणार्‍या भविष्यासाठी आपल्या हातात असलेला आज आपण गमावून बसतो. बरेचदा तर आपल्या हातात उत्तरंही असतात सगळ्या प्रश्नांची.  पण आपलं प्रश्नांवर जास्त […]

जग बदलतंय!!

काल दहावीचा निकाल लागला. माझ्या भाचीला 96.20% मार्कस् मिळालेत. तिच्या शाळेत तिचा दुसरा नंबर! आमच्या पुढच्या पिढीचं हे पाऊल पुढे पडतांना, एक नवा बदल देखील घडतांना दिसतोय. माझ्या नंतर कित्येक वर्षांनी आमच्या घरात, माझ्या आत्ये बहिणीची मुलगी याज्ञश्रीचा काल दहावीचा निकाल लागला आणि पोरीनी नंबरस् सुद्धा मस्त मिळवले. खूप अभिमानास्पद आहे हे! पण याही पेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे […]

झूम

आज सहज फेसबुक व्हिडिओ स्क्रोल करताना भाडिपा ह्या चॅनल वर झूम नावाची वेबसिरीज दिसली. पाच भागांची सिरीज! बनवली का? तर प्रॉडक्ट प्लेसमेंट!!बिरा नावाच्या बिअरची ॲड करायला ह्यांनी ही वेबसिरीज बनवली. बरंय, मराठी माणसाला स्पॉन्सर मिळतोय! पण, ह्याच्या पहिल्याच भागात, आई – वडील आजोबांच्या श्राद्धाच्या पानावर बिअर आणून ठेवतात. ठिक आहे, आजोबांना आवडत असावी बिअर. मग नंतर मुलगा (नायक), सिगरेट पित […]

बकुळ

आज कित्येक दिवसांनी ती माहेरी आली होती. कितीही कार्पोरेट कार्पोरेट म्हंटले तरी माहेर आणि आपलं गाव, जिथे बालपण गेलं, लहानाची मोठी झाली, पहिल्या वहिल्या प्रेमाच्या आठवणी, तारुण्यातील गोड गोष्टी हे सगळं आठवतं आणि मन अगदी हळवं होऊन जातं. आणि ह्या सगळ्यात आवडती होती तिची नेहमीची पायवाट… पावसात चिंब भिजलेली पायवाट..घरुन क्लासेसला जाताना तिला एक बाग लागायची. बाग कसली,घनदाट जंगलासारखाच भाग […]

मोगरा

हा असा मोगरा बहरला ना की त्याचा सारा गंध तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड असते माझी.. मग कित्ती तरी वेळ त्या मोगऱ्याच्या सानिध्यात घालवते. त्याचा सगळा गंध रोमारोमात साठवून घेते.. तो ही उधळण करत असतोच मुक्त हस्ते…मग मी ही गंधाळू लागते त्या मोगर्‍यासारखी.. खुलते, बहरते अन् तुला भेटतांना फुलते.. त्या भेटीत मग सारा सारा गंध रिता करते, तुझ्या श्वासात, तुझ्या मिठीत, तुझ्या […]

वळवाचा पाऊस

जर तू पैजेचा विडा असतास तरमलाही आवडलं असतं तुला जिंकायलापण तू, वळवाचा पाऊस आहेस…तुला जिंकणार कसं, अंदाज कसे बांधणार तुझ्या वागण्याचे!! मोठा लहरी आहेस तू..वाटेल तेंव्हा वाटेल तिथे बरसणारा…उष्मेनं लाही लाही झालेला प्रत्येक आसुसलेला कण तृप्त करणारा… क्वचित जरा जास्तच धसमुसळा…एका क्षणात सारं सारं रुप पालटणारा..मनाला एक निर्भेळ आनंद देणारा…..तनमन चिंब करणारा…..वळवाचा पाऊस….तुला कसं रे जिंकायचं…एक करते..तुझीच एक सर बनून […]

error: Content is protected !!