पेरेंट्स डे!

आजचं गूगल डुडल.. तसं तर आज साऊथ कोरियाचा पेरेंट्स डे.. पण सध्या अख्खा जगाकरता रोजच पेरेंट्स डे! आई वडिलांसाठीचे सगळेच खास दिवस!! पण हे असे दिवस खरंच खूप आवश्यक असतात. सगळ्या आई बाबांच्या मेहनतीला साजरा करण्यासाठी ह्या दिवसाची गरज आहे, खरंच आहे.. हे आता स्वतः त्या भूमिकेत गेल्यावर कळतं. खरं तर काळ बदलला तसे पालकत्वाचे संदर्भही बदलले. आधी आजी आजोबा, […]

मोगरा

उमलत राहशील तू मनातअसाच दिवस रात्रचैत्रातला पहिला बहर जसामग ऋतू कुठलाही असोतू कोमेजणार नाही..मी कोमेजूच देणार नाही तुलावैशाखातही तुझ्यासाठीसावली बनून उभी राहील..ओलावा, आसोशी तर आहेच…आणि गंध..तो आपण दोघं एकत्र असतानाअसाच दरवळत राहतो…उगाच का प्रत्येक ऋतूतआपल्यात मोगरा फुलतो….. मानसी

विणलेल्या गाठी

विणलेल्या गाठीतुझ्या माझ्या भेटीराहू दे गुतूंनएकमेकांत पापण्यांच्या पाठीदडलेली दिठीराहू दे खिळवूनएकमेकांत शब्द येता काठीमिटलेल्या ओठीजाऊ दे वाहूनएकमेकांत नक्षत्रांच्या भेटीतुझ्या माझ्या साठीराहू दे उजळूनएकमेकांत मानसी

खिडकीतली सर

गच्च डोळे मिटूनमनाची दारं सताडउघडी ठेवूनदोन्ही हातांची ओंजळठेवून दे आकाशाखाली..आभाळ भरून आलं कीभरेल ओंजळहीकानावर कोसळतीलकाही आवाजअन् पापण्यांवर स्वार होतीलकाही थेंब,त्यांना जगून घेत्याच क्षणी …मनात घर करतील तेअन् वाहू लागतील,ओघळू लागतीलअगदी आत आत…अन् मग तुझ्या गंधातन्हाऊन निघतील…पुन्हा नव्याने बरसण्यासाठीतुझ्या खिडकीतली सरअशीच कोसळत राहतेचिंब भिजण्यासाठी..

हे हसू नेमके ..

रुसून बसते कोषातच अन् कधी लागते डूलायाहे हसू नेमके वसंतात बघ कसे लागते फुलाया तू बहरत जाते शुभ्र फुलासम हरवत जातो मीहीमग पानापानांतून घुमणारी लाडिक लाडिक ग्वाहीहा गंध तुझाही धजावला मज गुन्हेगार ठरवायाहे हसू नेमके वसंतात बघ कसे लागते फुलाया त्या गोऱ्या रंगावरती रुळते बघ हलकीशी लालीती पुरे तेव्हढीच एक छटा जी उठून दिसते गालीका रंग उधळते पहाट माझे चित्त […]

गोठत चाललंय सारं.

गोठत चाललंय काआपल्या आत होतं ते…उष्म काहीतरी..डोळे ओलावणरंआतून ओढ जागवणारं..एखादं मन ओळखणारंएखादं मन जपणारंएका हातातून दुसर्‍या हातातसहज धावणारं ..गोठत चाललंय कीगोठलंच आहे…?कारण आता पडद्यावर टाहोअन् पडद्यामागे एक विजयी हसूपैश्यात न्हालेल,सत्तेने माजलेलंकुणाचा तरी पाय ओढूनपुढे गेलेलं….कुठेतरी अंधार पसरवूनउजाडलेलंनिर्लज्जपणे चेहर्‍यावरमिरवलेलं हसू…आणि जग बघतंय, विव्हळतंयरडतंय, मरतंयअन् हे हसू आणखीखुलतंयकसंय ना!!बाहेर वितळतंय सारंचपण आत मात्र गोठतंय….. 

आयुष्याचा शेला विणला

श्वास घेतला हातामध्येआला गेला काळ वेचलाएक उसवला एक गुंफलाआयुष्याचा शेला विणला शेव हजार विस्कटलेलेहा हवा अन् तोही घेतलारंग निवडला प्रत्येकाचाएका खाली एक रुजवलाआयुष्याचा शेला विणला कुंद मनाचा उजाड कप्पाउघडून दारे उन्हात गेलाखुलवून सारे पुन्हा पिसारेगर्भरेशमी काठ सजवलाआयुष्याचा शेला विणला बाकी सार्‍या उदासवाटाकाळोखातून सोडत गेलाहाती होते फक्त चांदणेचंद्र घेऊन त्यात जडवलाआयुष्याचा शेला विणला हात घेऊनी हाता मध्येहवा तेवढा पिळही दिधलाघट्ट बांधून […]

लामणदिवा

तुझ्या ओसरीवर पसरेल जरासा सोनेरी प्रकाश,अन् उजळून जाईल तुझं सारं अवकाश क्षणात, अगदी एकाच क्षणातजेव्हा पेटेल वात तिन्हीसांजेला ..रात्रभर तेवत राहण्यासाठी…तुझ्याही नकळत.. येणाऱ्या प्रत्येक झुळकेसोबत फडफडत राहिल ती.. तिचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी…जगाला, तुला, तुझ्या ओसरीला आणि तिच्या त्या लामणदिव्याला..तू फक्त बघ तिला येता जाता…. थोडं बोल तिच्याशी.. थोडं तुझं सांग थोडं तिचं ऐक..कधी हाताचा आडोसा दे तिला.. थोडी मायेची उब…अन् […]

तो, मी आणि पाऊस

तो, मी आणि पाऊसआमचं छानच त्रिकूट जमलं होतंमाझ्या शिवाय त्यालात्याच्या शिवाय मला अन्आमच्या शिवाय पावसालाकाही केल्या करमत नव्हतं आम्ही रोज भेटायचंचअसं काही ठरलं नव्हतंपण आम्ही भेटायचं म्हटल्यावरपावसाचं येणं तेवढं नक्की होतंआमच्या शिवाय पावसालाकाही केल्या करमत नव्हतं तो आला की तासंतासगप्पांमध्ये रमायचो आम्हीयेताना तसे कोरडेचमात्र कसं कुणास ठाऊकनंतर मात्र भिजायचो आम्हीआता हे भिजवणंहीपावसाचंच एक कारस्थान होतंकारणआमच्या शिवाय पावसालाकाही केल्या करमत नव्हतं […]

error: Content is protected !!