बहारें

कभी कोरी आँखों में खिलती बहारेंकभी कुछ पलों की है मिलती बहारें खुली आँख है ख़्वाब आते है कितनेकभी ख़्वाब में यूँही ढलती बहारें वहाँ जी रहें हो, सुकून मिल रहां हैं यहाँ सांस मे जब है घुलती बहारें समां हो रहा था ये बेताब कितना थी नजदीकीयाँ और पिघलती बहारें ये खुशबू सताती है कमबख़्त कितनी यहाँ इन दिलों […]

ही रात्र उगा गहरी होउन जात आहे डोहात त्या अता मी हरवून जात आहे धुंडाळले मी सारे, हे कोपरे मनाचे तू निज संगतीला, घेउन जात आहे वार्यास ह्या अताशा ना ठाव ना ठिकणा खिडकी मधून वेडा येउन जात आहे काळोख हाच येथे उरला असे विराणा भेसुर गीत कुठले गाऊन जात आहे नक्षत्र आठवावे कुठले मी ह्या घडीलातो चिंब देह नयनी […]

वसंत

कुठे तांबडे कुठे जांभळे रंग उधळती पानेकुठे कोरड्या फांदीवरचे झुरणे अन् ते गाणे कुणी वेचली कुणी टाकली कुणी सोडली मागे कुणी ठेवली पुस्तकात ती सुरेल जसे तराणे जरी कोरडे झाले सारे जरी वाळली झाडे कुठे अचानक हवीहवीशी हिरवी दिसती खोडे तिथेच रमते पुन्हा पुन्हा का मन हे जाऊन अडते तिथेच सुटते जुने पुराणे अडलेले ते कोडे कुठेच नाही दिसले बघ […]

या वळणावर

या वळणावरश्रावण झुलतोमेघ बहरतोपानो पानी रंग उधळतोया वळणावर या वळणावररात्र उतरतेनदी वाहतेचंद्र चांदणीमिलन घडतेया वळणावर या वळणावरराधा रमतेबकुळ माळतेदेह सावळाउगाच स्मरतेया वळणावर या वळणावरझुरे बासरीअंगावर सरीव्याकुळ होईसुनी ओसरीया वळणावर या वळणावरकळी उमललीराधा खुललीश्याम रंगी तीबहरून आलीया वळणावर या वळणावरकान्हा रुळलागोकुळ सजलापाव्या मधुनीसुर उमटलाया वळणावर या वळणावरश्रावण झुलतोअसाच दिसतोगौर – सावळाऋतू बरसतोया वळणावर                             

सय

धुकं लागते तरळूजसे रानात वनाततशी सय तुझी दाटेखोल खोल हृदयात दिसे अंधूक अंधूकजसे सारे ह्या धुक्यातमीही होत जाते धुंदतुझी आठव मनात धुके जाईल वाहूनआता पुढच्या क्षणालातू ही रुजशील ना रेवेड लावून जीवाला तुझा वास आहे खोलआत मनाच्या तळाशीजसे हरवते धूकेखोल झाडांच्या मुळाशी धुके बरसते पुन्हासर होऊन सावळीतू ही भिजवून जातोलाज डोळ्यात काजळी होते चिंब चिंब धरापुन्हा पांघरुन धुकेतुझ्या एका सयीपुढेमाझे […]

मुक्त बंधन

तुझं माझं नातं….कशानी बरं बांधायचं? आहे का कुठला वृक्ष ज्यालाकाही दोरे बांधून तुला कायमचंगुंतवून घेता येईल माझ्यात…..नाहीच….काय करू? श्वासांना गुंतवू तुझ्या अवतीभवती? त्यातच बांधला जाशील…त्यात तरी बांधल्या जाशील ना..? की नाहीच..? अरे हो.. तू तर सगळ्या बंधनांच्या पलीकडे आहेस ना!! मला तर वाटतं कीतू यमुनेसारखा वाहत राहशील असाच…ह्या त्या खडकाला धडकतकाठावर तुला स्पर्श करू पाहणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन… पुन्हा कधीही […]

उन्हं पावसाचा खेळ

अश्या पांगल्या सावल्यामाझा मनाच्या अंगणीउन्हं इथे डोईवरतुझ्या नभात चांदणी तेथे चंद्र लोटलेलामऊ उशीला टेकूनइथे उतरे हाताशीउष्मं किरणे अजून आता बरसेल तिथेबघ सर ओळखीचीइथे येईल वाहतहवा भरल्या दवाची तुझ्या सरीतले थेंबघे ना ओंजळ भरूनसवे चांदण्याच्या इथेथोडे दे ना पाठवून बरसेल ते चांदणेमग अंगणात येथेजसे ओंजळीत तुझ्याथेंब पावसाळी तेथे तुझा पाऊसही असाइथे चांदण्यात न्हालाआहे पाठवला थोडासवे घेऊन उन्हाला

पहाट गाणे

कृष्ण नभातून झरझरणारीओढ निराळी तुझ्याच साठीअश्या पहाटे कवेत यावीतुझी सावली यमुनेकाठी तुझ्या मिठीतून वाहत येतोगंध जरासा हवाहवासान्हाऊन जाते अलगद सारेउरतो मागे श्वास नवासा कुठेतरी मग पूर्व दिशेलाहळूच तांबडे नाचत येईहरित तृणांची दाटी वाटीकणकण सारे खुलून जाई अश्याच वेळी जाग येऊनीजराजराशी मिठी सुटावीनजर भिडावी नजरेला अन्पुन्हा पाकळी जरा मिटावी तुझेच सारे स्पर्श उरावेचराचरावर तुझीच छायातुला भेटूनी खुलून येतेगोड गुलाबी नाजूक काया […]

मूळ

घट्ट रुजले मूळ माझे प्रेम झाले खूळ माझे  वाहती वाऱ्यावरी का? शब्द झाले धुळ माझे बोचले काटे तुला का? चित्त हे व्याकूळ माझे सांग का कळवू तुला मी आतले ते शूळ माझे?  वाहिले सारेच तुजला शोधतो का कुळ माझे? गुंतला हा जीव जेथे हेच ते देऊळ माझे मानसी.

बहर

कसा बहर बहरफुले कण कण साराजेंव्हा येतो रे भेटीलातुझा गंधाळला वाराकुठे ठेऊ हा बहरक्षणी आला उधळतगेला रंगून रंगाततुझ्या माझा देह गोरा…

error: Content is protected !!