मराठी कविता
ही रात्र उगा गहरी होउन जात आहे
डोहात त्या अता मी हरवून जात आहे
धुंडाळले मी सारे, हे कोपरे मनाचे
तू निज संगतीला, घेउन जात आहे
वार्यास ह्या अताशा ना ठाव ना ठिकणा
खिडकी मधून वेडा येउन जात आहे
काळोख हाच येथे उरला असे विराणा
भेसुर गीत कुठले गाऊन जात आहे
नक्षत्र आठवावे कुठले मी ह्या घडीला
तो चिंब देह नयनी बिलगून जात आहे
मी एकटा उशाशी घेउन चांद तारे
शब्दांत भाव सारे वाहून जात आहे
डोळ्यांत प्राण आता आणुन साठवावे
इतकेच मी उराशी घेऊन जात आहे
आता असा सरावा साराच जन्म माझा
माझ्यातल्या मला मी विसरून जात आहे
डाॅ. मानसी सगदेव मोहरील
©️2021bhavagarbha
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0