मराठी कविता
मोगरा
उमलत राहशील तू मनात
असाच दिवस रात्र
चैत्रातला पहिला बहर जसा
मग ऋतू कुठलाही असो
तू कोमेजणार नाही..
मी कोमेजूच देणार नाही तुला
वैशाखातही तुझ्यासाठी
सावली बनून उभी राहील..
ओलावा, आसोशी तर आहेच…
आणि गंध..
तो आपण दोघं एकत्र असताना
असाच दरवळत राहतो…
उगाच का प्रत्येक ऋतूत
आपल्यात मोगरा फुलतो…..
मानसी
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0