मराठी कविता
या वळणावर
या वळणावर
श्रावण झुलतो
मेघ बहरतो
पानो पानी
रंग उधळतो
या वळणावर
या वळणावर
रात्र उतरते
नदी वाहते
चंद्र चांदणी
मिलन घडते
या वळणावर
या वळणावर
राधा रमते
बकुळ माळते
देह सावळा
उगाच स्मरते
या वळणावर
या वळणावर
झुरे बासरी
अंगावर सरी
व्याकुळ होई
सुनी ओसरी
या वळणावर
या वळणावर
कळी उमलली
राधा खुलली
श्याम रंगी ती
बहरून आली
या वळणावर
या वळणावर
कान्हा रुळला
गोकुळ सजला
पाव्या मधुनी
सुर उमटला
या वळणावर
या वळणावर
श्रावण झुलतो
असाच दिसतो
गौर – सावळा
ऋतू बरसतो
या वळणावर
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0