सामाजिक
जग बदलतंय!!

जग बदलतंय!!

काल दहावीचा निकाल लागला. माझ्या भाचीला 96.20% मार्कस् मिळालेत. तिच्या शाळेत तिचा दुसरा नंबर! आमच्या पुढच्या पिढीचं हे पाऊल पुढे पडतांना, एक नवा बदल देखील घडतांना दिसतोय. माझ्या नंतर कित्येक वर्षांनी आमच्या घरात, माझ्या आत्ये बहिणीची मुलगी याज्ञश्रीचा काल दहावीचा निकाल लागला आणि पोरीनी नंबरस् सुद्धा मस्त मिळवले. खूप अभिमानास्पद आहे हे! पण याही पेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की ‘इतके’ मार्कस् मिळूनही तिने पुढे डाॅक्टर किंवा इंजिनिअर किंवा तत्सम जबरदस्तीवाल्या प्रोफेशनस् कडे न वळता आपल्या आवडीनुसार आपले विषय निवडले आहेत.  (हा आता कुणाला डाॅक्टर किंवा इंजिनिअर’च’ बनायचं असेल तर गोष्ट वेगळी). 
तिला कधीही विचारलं, “याज्ञू काय करायचंय पुढे?” तर ती म्हणते, “मावशी तू लिहितेस तसं मला लिहायचं आहे.”
मला खूप मस्त वाटतं.!! एक तर माझं लिखाण तिला आवडतं म्हणून आणि तिला आत्ताच कळलंय, तिला काय करायचंय ते!! ह्या वयात बरेचदा मुलांना उमगलेलंच नसतं की आपल्याला आयुष्यात काय करायचंय. नौकरी किंवा कुठलही काम हे फक्त पैसे कमावण्याचं साधन नसतं. तो आपल्या आयुष्याचा एक मोठा आणि महत्वाचा भाग असतो..
सध्या एक गाणं खूप गाजतंय, I am on vacation; (मी लिंक खाली देईलच). ह्या गाण्यातही गायक हेच म्हणतोय की माझ्या कामावर माझं प्रेम असल्याने मी नेहमीच एंजॉय करतो, अगदी सुटीवर असल्या सारखा! असं काही तरी व्हायलाच हवं. रोजचा दिवस ढकलत आयुष्य जगण्यात काय मजा?
आजकाल मी बरेचदा माझ्या किंवा अजितच्या मित्र – मैत्रिणींशी बोलते, तेंव्हा हा विषय निघतो की आधीच पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हवं होतं, खूप घाई झाली. (मुलींच्या बाबतीत लग्नाची आणि मुलांच्या बाबतीत नौकरीची. कारण ते असतात ना, सतत आयुष्यात नाक खुपसणारे चार लोकं.)  ‘अरे वय झालं!!!’ आणि मग आपणही लोकलाजेस्तव तेच करतो जे मनाला पटणारं नसतं! मग असं दहा – बारा वर्षांनी पश्चाताप होऊन फायदा नसतो. प्रयत्न केल्याने होतं खरं तर सारंच पण वेळ, परिस्थिती, सगळं हाताबाहेर गेलेलं असतं.
आपलं करिअर निवडतांना मनाविरुद्ध कधीही जाऊ नका! आणि माय बापहो… पोरांना निवडू द्या हवं ते! कारण ज्या चार लोकांना तुम्हाला नाव ठेवायचे असतील ते ठेवतीलच, काहीही झालं, कितीही चांगलं केलं तुम्ही तरी; पण तुमचं पोरगं आनंदात जगायला हवं असेल तर त्याला ज्यात आनंद वाटतो तेच करू द्या! पुन्हा ही भिती नको त्यांच्या मनात, “अब्बा, नहीं मानेंगे”
चार वर्षांचं इंजिनिअरिंग आठ वर्षांत करण्यात काहीच अर्थ नाहीये! पुन्हा नावाला डिग्री हाती येईल पण डोकं नाही चालंलं तर वाट लागेल! आयुष्यात जगायला आत्मविश्वासही हवाच ना!
ते तेंव्हाच होईल जब तुम दिल की सुनोगे!!
दिल की सुनोगे, तो खुश रहोगे!!! फिर खुल के यह कह़ भी सकोगे..

Illuminate, my future bright, so thankful for everything
Rejuvenatin’ my inner light as I work hard for all I need
Open arms, embracing life and all of which you gave to me
Hard work, it pays off, I’m happy now, it’s paying me
Close my eyes, sometimes can feel as if I float away
I love the life I live and enjoy the ride along the way
“I make a living out of living, ” yeah, that’s what I’ll say
I’ve got one life to live, and I wouldn’t live it no other way
https://youtu.be/7zok9co_8E4

डॉ. मानसी सगदेव – मोहरील
©️2021bhavagarbha

error: Content is protected !!