मराठी कविता
मूळ
घट्ट रुजले मूळ माझे
प्रेम झाले खूळ माझे
वाहती वाऱ्यावरी का?
शब्द झाले धुळ माझे
बोचले काटे तुला का?
चित्त हे व्याकूळ माझे
सांग का कळवू तुला मी
आतले ते शूळ माझे?
वाहिले सारेच तुजला
शोधतो का कुळ माझे?
गुंतला हा जीव जेथे
हेच ते देऊळ माझे
मानसी.
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0