झूम

आज सहज फेसबुक व्हिडिओ स्क्रोल करताना भाडिपा ह्या चॅनल वर झूम नावाची वेबसिरीज दिसली. पाच भागांची सिरीज! बनवली का? तर प्रॉडक्ट प्लेसमेंट!!बिरा नावाच्या बिअरची ॲड करायला ह्यांनी ही वेबसिरीज बनवली. बरंय, मराठी माणसाला स्पॉन्सर मिळतोय! पण, ह्याच्या पहिल्याच भागात, आई – वडील आजोबांच्या श्राद्धाच्या पानावर बिअर आणून ठेवतात. ठिक आहे, आजोबांना आवडत असावी बिअर. मग नंतर मुलगा (नायक), सिगरेट पित […]

मुक्त बंधन

तुझं माझं नातं….कशानी बरं बांधायचं? आहे का कुठला वृक्ष ज्यालाकाही दोरे बांधून तुला कायमचंगुंतवून घेता येईल माझ्यात…..नाहीच….काय करू? श्वासांना गुंतवू तुझ्या अवतीभवती? त्यातच बांधला जाशील…त्यात तरी बांधल्या जाशील ना..? की नाहीच..? अरे हो.. तू तर सगळ्या बंधनांच्या पलीकडे आहेस ना!! मला तर वाटतं कीतू यमुनेसारखा वाहत राहशील असाच…ह्या त्या खडकाला धडकतकाठावर तुला स्पर्श करू पाहणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन… पुन्हा कधीही […]

बकुळ

आज कित्येक दिवसांनी ती माहेरी आली होती. कितीही कार्पोरेट कार्पोरेट म्हंटले तरी माहेर आणि आपलं गाव, जिथे बालपण गेलं, लहानाची मोठी झाली, पहिल्या वहिल्या प्रेमाच्या आठवणी, तारुण्यातील गोड गोष्टी हे सगळं आठवतं आणि मन अगदी हळवं होऊन जातं. आणि ह्या सगळ्यात आवडती होती तिची नेहमीची पायवाट… पावसात चिंब भिजलेली पायवाट..घरुन क्लासेसला जाताना तिला एक बाग लागायची. बाग कसली,घनदाट जंगलासारखाच भाग […]

उन्हं पावसाचा खेळ

अश्या पांगल्या सावल्यामाझा मनाच्या अंगणीउन्हं इथे डोईवरतुझ्या नभात चांदणी तेथे चंद्र लोटलेलामऊ उशीला टेकूनइथे उतरे हाताशीउष्मं किरणे अजून आता बरसेल तिथेबघ सर ओळखीचीइथे येईल वाहतहवा भरल्या दवाची तुझ्या सरीतले थेंबघे ना ओंजळ भरूनसवे चांदण्याच्या इथेथोडे दे ना पाठवून बरसेल ते चांदणेमग अंगणात येथेजसे ओंजळीत तुझ्याथेंब पावसाळी तेथे तुझा पाऊसही असाइथे चांदण्यात न्हालाआहे पाठवला थोडासवे घेऊन उन्हाला

पहाट गाणे

कृष्ण नभातून झरझरणारीओढ निराळी तुझ्याच साठीअश्या पहाटे कवेत यावीतुझी सावली यमुनेकाठी तुझ्या मिठीतून वाहत येतोगंध जरासा हवाहवासान्हाऊन जाते अलगद सारेउरतो मागे श्वास नवासा कुठेतरी मग पूर्व दिशेलाहळूच तांबडे नाचत येईहरित तृणांची दाटी वाटीकणकण सारे खुलून जाई अश्याच वेळी जाग येऊनीजराजराशी मिठी सुटावीनजर भिडावी नजरेला अन्पुन्हा पाकळी जरा मिटावी तुझेच सारे स्पर्श उरावेचराचरावर तुझीच छायातुला भेटूनी खुलून येतेगोड गुलाबी नाजूक काया […]

मोगरा

हा असा मोगरा बहरला ना की त्याचा सारा गंध तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड असते माझी.. मग कित्ती तरी वेळ त्या मोगऱ्याच्या सानिध्यात घालवते. त्याचा सगळा गंध रोमारोमात साठवून घेते.. तो ही उधळण करत असतोच मुक्त हस्ते…मग मी ही गंधाळू लागते त्या मोगर्‍यासारखी.. खुलते, बहरते अन् तुला भेटतांना फुलते.. त्या भेटीत मग सारा सारा गंध रिता करते, तुझ्या श्वासात, तुझ्या मिठीत, तुझ्या […]

मूळ

घट्ट रुजले मूळ माझे प्रेम झाले खूळ माझे  वाहती वाऱ्यावरी का? शब्द झाले धुळ माझे बोचले काटे तुला का? चित्त हे व्याकूळ माझे सांग का कळवू तुला मी आतले ते शूळ माझे?  वाहिले सारेच तुजला शोधतो का कुळ माझे? गुंतला हा जीव जेथे हेच ते देऊळ माझे मानसी.

error: Content is protected !!