मराठी कविता
विणलेल्या गाठी
विणलेल्या गाठी
तुझ्या माझ्या भेटी
राहू दे गुतूंन
एकमेकांत
पापण्यांच्या पाठी
दडलेली दिठी
राहू दे खिळवून
एकमेकांत
शब्द येता काठी
मिटलेल्या ओठी
जाऊ दे वाहून
एकमेकांत
नक्षत्रांच्या भेटी
तुझ्या माझ्या साठी
राहू दे उजळून
एकमेकांत
मानसी
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0