पैलतीरावर
वळवाचा पाऊस
जर तू पैजेचा विडा असतास तर
मलाही आवडलं असतं तुला जिंकायला
पण तू, वळवाचा पाऊस आहेस…
तुला जिंकणार कसं, अंदाज कसे बांधणार तुझ्या वागण्याचे!! मोठा लहरी आहेस तू..
वाटेल तेंव्हा वाटेल तिथे बरसणारा…
उष्मेनं लाही लाही झालेला प्रत्येक आसुसलेला कण तृप्त करणारा… क्वचित जरा जास्तच धसमुसळा…
एका क्षणात सारं सारं रुप पालटणारा..
मनाला एक निर्भेळ आनंद देणारा…..
तनमन चिंब करणारा…..
वळवाचा पाऊस….
तुला कसं रे जिंकायचं…
एक करते..
तुझीच एक सर बनून राहते निरंतर तुझ्याच सोबत..
तुला जिंकण्यापेक्षाही माझं हे असं तुझ्यात हरवणं कित्येक पटीने मोहक आहे…
ह्या मोहकते पुढे सारं जग नाहक आहे….
मानसी
Dr. Manasi Sagdeo-Mohril
0