वळवाचा पाऊस

जर तू पैजेचा विडा असतास तरमलाही आवडलं असतं तुला जिंकायलापण तू, वळवाचा पाऊस आहेस…तुला जिंकणार कसं, अंदाज कसे बांधणार तुझ्या वागण्याचे!! मोठा लहरी आहेस तू..वाटेल तेंव्हा वाटेल तिथे बरसणारा…उष्मेनं लाही लाही झालेला प्रत्येक आसुसलेला कण तृप्त करणारा… क्वचित जरा जास्तच धसमुसळा…एका क्षणात सारं सारं रुप पालटणारा..मनाला एक निर्भेळ आनंद देणारा…..तनमन चिंब करणारा…..वळवाचा पाऊस….तुला कसं रे जिंकायचं…एक करते..तुझीच एक सर बनून […]

अलक मातृदिन

#अलक काही मातृदिन असेही… “आज बोलायचंच नाही! कामही करणार नाही, स्वयंपाकही नाही…नाही स्वयंपाकघरात तर जाणारच नाही मी! घरी सगळेच राहणार, खाणार सगळेच, पसारा सगळेच करणार पण आवरायचा मीच. नास्ता करा, स्वयंपाक करा, जेवण झाल्यावर भांडी घासा, मेला हा कोरोना पण जात नाही. चांगलं मदतीला मावशी होत्या…” ह्या सगळ्या विचारांशी तिची लढाई सुरू होती ती बेडरूम मधल्या रजईत… पण शेवटी घरकाम […]

बहर

कसा बहर बहरफुले कण कण साराजेंव्हा येतो रे भेटीलातुझा गंधाळला वाराकुठे ठेऊ हा बहरक्षणी आला उधळतगेला रंगून रंगाततुझ्या माझा देह गोरा…

पेरेंट्स डे!

आजचं गूगल डुडल.. तसं तर आज साऊथ कोरियाचा पेरेंट्स डे.. पण सध्या अख्खा जगाकरता रोजच पेरेंट्स डे! आई वडिलांसाठीचे सगळेच खास दिवस!! पण हे असे दिवस खरंच खूप आवश्यक असतात. सगळ्या आई बाबांच्या मेहनतीला साजरा करण्यासाठी ह्या दिवसाची गरज आहे, खरंच आहे.. हे आता स्वतः त्या भूमिकेत गेल्यावर कळतं. खरं तर काळ बदलला तसे पालकत्वाचे संदर्भही बदलले. आधी आजी आजोबा, […]

गुंता

कधी तरी एखादा गुंता नकोश्या नात्यांचाही बांधल्या जातो. नको असतं ते रखडणं तरी सोडवत नाही. एखाद्या रुक्ष दोऱ्याचं कसं होतं; ताणला की गाठं आणखीनच जास्त घट्ट होत जाते, रुतायला लागते, पिळ पडतो, पण सुटतही नाही आणि तुटतही नाही. कात्री घेऊन सोडवायचं तरी गाठ सुटणारी नसते.  बारीक गाठ, घट्ट बसलेली असते नेहमी करता… दोरा कापला तर उरलेला दोरा, कितीही का असेना […]

मोगरा

उमलत राहशील तू मनातअसाच दिवस रात्रचैत्रातला पहिला बहर जसामग ऋतू कुठलाही असोतू कोमेजणार नाही..मी कोमेजूच देणार नाही तुलावैशाखातही तुझ्यासाठीसावली बनून उभी राहील..ओलावा, आसोशी तर आहेच…आणि गंध..तो आपण दोघं एकत्र असतानाअसाच दरवळत राहतो…उगाच का प्रत्येक ऋतूतआपल्यात मोगरा फुलतो….. मानसी

घर का भेदी

बबन्या गावातला द्वाड मुलगा!! खोड्या काढणारा, कुणाला न जुमानणारा, अतिशय आगाऊ मुलगा! त्याची बोलती जर कुणासमोर बंद होत असेल तर आईसमोर, बाकी बापालाही तसा तो जुमानत नव्हताच.  मग बाप मात्र त्याला चांगलाच लाथाडायचा.  बबन्याच्या करामतीही तशीच असायच्या.कधी गावातल्या लोकांना त्रास दे, कधी बायकांची मजा उडव, कधी येणाऱ्या जाणाऱ्यांना वाकड बोल, तर कधी मुलींना उगाच त्रास दे; त्याचे हे थेर पाहून […]

विणलेल्या गाठी

विणलेल्या गाठीतुझ्या माझ्या भेटीराहू दे गुतूंनएकमेकांत पापण्यांच्या पाठीदडलेली दिठीराहू दे खिळवूनएकमेकांत शब्द येता काठीमिटलेल्या ओठीजाऊ दे वाहूनएकमेकांत नक्षत्रांच्या भेटीतुझ्या माझ्या साठीराहू दे उजळूनएकमेकांत मानसी

चांदनी

रात का वक्त है ख़ामोशी तोड़ दोबंद दरवाज़े क्यों है? ये ताले  तोड़ दो आसमान के नीचे भी जन्नत ही हैनिंदोके पेहरे है आँखोपर, सारे तोड़ दो जिन्हे निभाते गुज़र जाएगी ये जिंदगीबेवजह है वो रस्मो रिवाज़ प्यारे, तोड़ दो आंगन मै ही डेरा डाले बैठा है चांदवहां आने से रोकती सारी जंजीरे तोड दो हम बस अभी है यहाँ […]

क्षण

तल्लीन होता आलं पाहिजेदंग होता आलं पाहिजेएकरुप होता आलं पाहिजेकशाशी तरी…आपण असतोच आपल्यासाठी…. पण एकटे मात्र कधीच नसतो.. सतत काही तरी मागे पुढे असतं आपल्या… मग मागच्या आठवणीत अन् समोरच्या आशेत झुरत बसतो आपण.. काही चुकलेलं, सुटलेलं पूर्ण करायच्या नादात उद्याचं सगळं ठरवतो… कालच्या विचारानी उद्याचं ठरवायचा नादच लागून जातो.. अन् ह्या नादात आहे त्याच्याशी एकरुप व्हायचं राहून जातं…एखादं गाणं […]

error: Content is protected !!