सामाजिक
सखी

सखी

टीव्ही वर कॉमेडी नाईट्स बघत राहुल आणि योगिनी आपल्या शनिवारची संध्याकाळ घालवत होते. हसून लोटपोट होणाऱ्या राहुलची नजर बऱ्याच वेळाने अस्वस्थ योगिनी कडे गेली. त्यांची एकुलती एक मुलगी, तिच्या वयाच्या १० व्या वर्षी नाईट आऊट ला गेली होती; गेली होती तिच्या मैत्रीणीकडेच पण तरीही रात्री मुलींनी घराबाहेर राहणं म्हणजे आजकाल सुरक्षित नाही हे जाणून होती योगिनी! तिला पाहून न राहवून राहुल ओरडला,”अरे काय यार योग्या, जरा तरी मूड चांगला ठेव, इतक्या दिवसांनी आपल्याला असा वेळ मिळतोय. पोरगी नाहीये, काही काम नाहीये, उद्या सुटी; असा योग कधी जुळून येतो का? जरा रोमॅंटिक गोष्टी करायला गेलं तरी प्रॉब्लेम, पिक्चर पाहायला जाऊ तरी प्रॉब्लेम, डिनरला जाऊ ते पण नाही, काय झालाय काय तुला? पूर्वी आपण किती मजा करायचो शनिवारी. पब, डिस्को, डिनर, मित्रांबरोबर बाहेर फिरणे. मला माहितीये सध्या अनु मध्ये बिझी असते तू, तुला दमायला होत ऑफिस घर सगळंच,पण ह्याचा अर्थ असा नाही ना की आपण आपल्या आयुष्याचं असं खोबरं खरायच.” 

“मला राग येतोय ह्या परिस्थितीचा. तुला कळत नाहीये मी का नाराज आहे, अनुला वाटत मी तिच्या आयुष्याची व्हिलन आहे, मला माझ्या मुलीच्या सुरक्षिततेची चिंता आहे हे कुणालाच काळात नाहीये, तुम्ही तिला पाठवा नाईट आऊटला आणि मला म्हणा एन्जॉय दि लाईफ! कस एन्जॉय करू मी, अरे तुला काळात नाहीये का आजकाल मुलं कुठेच सुरक्षित नाहीत. ती दहा वर्षांची आहे आता. आता तीच नाजूक वय आहे, आता केंव्हाही तिला मासिक पाळी येईल. तिच्याशी बोलायला हवं, कस ते प समजत नाहीये! आय हेट धिस सिच्यूएशन. “

“अग, पण ती गेलीये ते तुझ्याच मैत्रिणी कडे ना. आपण ओळखतो त्यांना चांगलंच! रेवती आणि निशांत खूप चांगले आहेत.”

“त्याबद्दल शंकाच नाही रे, पण … “

“पण बिण काही नाही. रिलॅक्स! आणि तिच्याशी बोलूच आपण ती स्ट्रॉंग आहे, तिला कराटे शिकवू”

“यू आर जस्ट इम्पॉसिब्बल”

दुसऱ्या दिवशी योगिनी आणि राहुल सकाळीच अनुष्काला घ्यायला रागिणी कडे गेले! अनु जरा त्यांच्या लवकर येण्यावर रागवलीच होती पण घरी जायचं म्हणून तयार होऊन बसली होती. रेवती आणि योगिनींच्या गप्पांच्या ओघात, योगिनी आपली काळजी रेवतीजवळ बोलून बसली. रेवतीही एका मुलीची आई, त्यामुळे तीही ह्याच मताची होती. रेवती सुद्धा आज जरा अस्वस्थ होतीच आणि योगिनींच्या ह्या बोलण्यामुळे आणखीनच अधीर झाली. 

“योगिनी तू आत्ता बोललीस ते बरच झालं, मला सुद्धा तुझ्याशी आणि नेहाच्या आईशी बोलायचं होतच. आपण भेटायचं का उद्या दुपारी. मुली शाळेत गेल्या कि भेटू.”

“चालेल, लंच करू सोबत, मी ऑफिस जवळच्या हॉटेल मध्ये बुक करते टेबल”

“नेहाच्या आईला सांगशील आज?”

“हो”

त्यांचं बोलणं आटोपल्यावर अनुष्का आणि नेहाला घेऊन राहुल आणि योगिनी निघाले. नेहाला तिच्या घरी सोडताना तिच्या आईला सोमवारच्या मीटिंग बद्दल सांगून योगिनी आणि राहुल घरी आले. अनुष्काला रुसलेली पाहून राहुल आणि योगिनीनि तिच्या आवडत्या हॉटेल मध्ये जेवायला जायचा बेत आखला होता, पण आज अनु नको म्हणाली! “आई माझी नाही इच्छा, तूच काहीतरी बनव!”

“अरे  वा, आज दिवस कुठून उगवला! हॉटेलच्या मेनू पेक्षा आईच्या हातच खायचं मॅडमला!! सांग सांग आज तू जे म्हणशील ते!”

“आई तू आज नूडलस बनव!”

“चालेल, गिव्ह मी सम टाइम”

“थँक यू”

तीच हे वागणं बघून योगिनीच विचारचक्र भिरभिरू लागलं! हे अनुच वागणं नॉर्मल नव्हतंच! ती शांत होती, भेदरलेली, त्यात रेवतीही भेटायचं म्हणत होती म्हणजे नक्कीच काहीतरी झालाय हे योगिनी जाणून होती. पण अनुला काहीही विचारायचं नाही हे तिनी ठरवलं होत. दुसऱ्याच्या दिवशी रेवती, योगिनी आणि अर्चना तिघी भेटल्या. 

“योगिनी – अर्चना मला तुम्हाला दोघींना काही सांगायचंय. बघा तस काळजीच कारण नाही पण काल मुली नॉर्मल नव्हत्या वागत, मी रूम वर पाळत नाही ठेवली पण एकदा जेंव्हा मी मुलींना काही हवं नको ते बघायला गेली तेंव्हा नेहा रडत होती असं वाटलं. ती कुणा तरी मुलाबद्दल बोलत होती. पण पुढे काही ऐकू येण्यापूर्वीच मला एक फोने आला, त्याच्या आवाजांनी मुलींच्या लक्षात आलं माझं तिथे असणं आणि सगळंच बोलणं खुंटलं”

“योगिनी तुझं बोलणं कळतंय मला, नेहा खरंच खूप नाराज असते आजकाल. म्हणजे तिला सतत मी किंवा तिचे बाबा सोबत हवे असतात. जेंव्हा तू बोलवलस तेंव्हाच वाटलं असाच काहीस झालं असेल. पण तुला काही कळलं का ग?” अर्चना कळवळून रडू लागली. अर्चना खूप साधी होती. बाहेरच जग तिच्याकरता अगदीच दुष्टचक्रासारखं होत आणि त्यात तिची मुलगी अडकली आहे हे तिला जाणवलं होत! 

“अग तू रडतेस का अर्चना?” रेवती आणि योगिनी दोघीही तिला आधार देत बोलल्या! 

“आपण माहित करून घेऊ काय झालाय ते?आजच विचारू मुलींना” 

“नाही रेवती”

“अग नाही काय”

“मुली आजपर्यंत नाही बोलल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे जे सांगायला मुलींना धीर होत नाहीये. आपल्याला दुसरा मार्ग शोधून काढायला हवा. “

“पुन्हा एक रात्र मुलींना जमू देऊ ह्या शुक्रवारी” रेवती म्हणाली!

“तोपर्यंत कशी वाट बघायची ग?” काकुळतीला येऊन अर्चना विचारात पडली. 

“आपण तिघींनीही आपल्या मुलींसोबत विश्वासाने बोलायला हवं, त्याकरता त्यांना एकदा आज किंवा उद्या भेटू देऊ, बघू काही उपाय निघतोय का? आज तिघीही मुली आमच्याकडे येऊ देत. तसाही अनु बऱ्याच दिवसांचा हट्ट करत होती की त्या तिघींना पास्ता पार्टी करायची आहे. ती आज होऊन जाऊ देत माझ्या घरी. आज यावर उपाय काढू” योगिनींच्या ह्या शब्दांनी अर्चनाला धीर आला!

संध्याकाळी तिघी मैत्रिणी पास्ता पार्टी करता आपल्या मुलींसकट योगिनींच्या घरी जमल्या! मुली अनुच्या रूम मध्ये बसल्या होत्या तेंव्हा योगिनी, अर्चना आणि रेवती तिथे आल्या. 

आपल्या मुलींना खेळतांना पाहून योगिनी म्हणाली, “रेवती तुला आठवत, आपण केवढा दंगा घालायचो लहान पाणी. बाबांनी आणून दिलेला तो किचन सेट!!”

“हो ना! तुला सांगते अर्चना एका मुलांनी खूप मार खाल्लाय त्या सेट करता”

“का ग?” अर्चना करता ह्या आठवणी नवीन होत्या!

“अग एकदा एक मुलगा जबरदस्ती आमची खेळणी घेऊन गेला, मोठाच होता जरा पण गुंड! आमची खेळणी घेऊन गेला आणि आम्हाला म्हणाला खेळणी पाहिजे असतील तर या माझ्या सोबत! पण आम्ही तिथे समजलो कि आमची शक्ती ह्याच्यापुढे तोकडीच! बर घरच्यांनी सांगितलं होत कि घरातच घरातच खेळा पण आम्ही त्यांचं न ऐकता गेलो बाहेर . आता घरी काय उत्तर द्यायचं कळेच ना! मग हिम्मत करून दोघींनीही घरच्यांना सांगितलं. दुसऱ्यादिवशी रेवतीच्या बाबांना घेऊन आम्ही तिथे गेलो, पण बाबा म्हणाले तुम्ही आधी जा मी बघतो काय करतो तो ते. आम्ही त्याच्या समोर गेलो त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला “उशिरा का होईना तुम्ही आल्या तर, खेळणं हवाय मग जवळ ये माझ्या” पण काकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही त्याच्या फार जवळ न जात खेळणी पण तो काही खेळणी द्यायला तयारच नव्हता, तो आमच्या वर हात उचलणार तेवढ्यात रेवतीचे बाबा आलेत आणि त्यांनी त्याला चांगलं धु धु धुतला”

“पण आई तुम्ही तुमच्या बाबांना ह्याबद्दल सांगितलं” आश्चर्य चकित झालेली अनु योगिनीला विचारू लागली

“अग हो!” रेवती उद्गारली, “आपल्याला बाहेरच्या जगात कधीही कुठलीही अडचण अली तरी आई बाबाच ती सोडवू शकतात ह्यावर आमचा गाढ विश्वास होता तेंव्हा आणि आताही आहे.” 

“मग मावशी त्या मुलाचं काय झालं”, कुतूहलाने नेहा विचारू लागली. 

“त्यावेळी आम्हाला वाटलं तो मुलगा फक्त आम्हाला दमदाटी करायला किंवा त्रास द्यायला असं वागला, पण नंतर लक्षात आलं कि तो आम्हाला चुकीच्या पद्धतींनी स्पर्श करून आमचा लैंगिक छळ करू पाहत होता! तेंव्हा कुठे आम्हाला काही कळायचं, पण घरच्यांना कळायचं. आता तुम्हाला टीव्ही मुळे वगरे असल्या गोष्टी कळतात, शाळेत सुद्धा शिकवलं असेलच नाही, योग्य आणि अयोग्य स्पर्शाबद्दल?” रेवतीनी त्या घटनेमागचे तथ्य उलगडले तेंव्हा तिन्ही मुली स्थब्ध झाल्या होत्या. 

“पण प्रत्येकाला माहिती असायलाच हवं नाही, चांगल्या आणि वाईट स्पर्शातला फरक” अर्चना उद्गारली!

“अगदीच!” अर्चनाला दुजोरा देत योगिनी म्हणाली तेवढ्यात इतक्या वेळ शांत बसलेली शाल्मली म्हणाली, “आई आम्हाला सांग ना कस ओळखायचं?” 

“आग सोपं आहे, जेंव्हा कुणी आपल्याला स्पर्श करतो आणि तो स्पर्श आपल्याला चांगला वाटत नाही तेंव्हा तो वाईट स्पर्श असतो. म्हणजे बघ आता मी योगिनी मावशी, अर्चना मावशी तुझे बाबा तुला घेतात तेंव्हा तुला कस वाटत? छानच ना! आजी तुझा गालगुच्चा घेते तेंव्हा तुला आवडत ना ते? पण तेच जर इतर परक्यांची कुणी तुला जवळ घेतलं तर तुला ते तितकं चान्गले वाटणार नाही. त्या स्पर्शात माया नसते, आपल्या लोकांचं प्रेम नसत तेंव्हा तो स्पर्श आपल्याला तेवढा आवडत नाही जितका आपल्या लोकांचा स्पर्श आवडतो. आणि जर कुणी आपल्या जवळचा नसेल तर त्याच्या फार जवळ आपण जायचं सुद्धा नाही. हॅन्ड शेक पर्यंत ठीक आहे, पण त्याच्या मांडीवर, कडेवर कधीही जायचं नाही. आपल्या शरीराच्या झाकलेल्या भागांना तर कुणालाच हात नाही लावू द्यायचा. जर कुणी तुम्हाला म्हंटल आग मी तर तुझा काकाच आहे ये माझ्या जवळ, तर त्याला सरळ ‘नाही’ म्हणायचं! ‘नाही’ म्हणायला सुद्धा शिकायला हवं! नेहमीच गुड गर्ल बनून राहायची गरजच नसते! आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपला सेफ झोन आपल्याला माहिती असायला हवा, त्या सेफ झोन मध्ये आपले आई बाबा, बहिणी, आपल्या मैत्रिणी जश्या तुम्ही तिघी एकमेकींच्या सेफ झोन मध्ये आहेत, असे सगळे लोक असावेत! इतर कुणीच नाही! एवढी काळजी घेतली कि झालं!”

“पण मावशी जर कुणी असं काही करत असेल, असा कुणी जो तुमच्यापेक्षा मोठा आहे, ताकदवर पण आहे, तेंव्हा?” नेहाचा प्रश्न ऐकून क्षणभर सगळे हादरले, पण तिघी आईनी ठरवलं होत कि मुलींपुढे व्यक्त व्हायचं नाही!

“अग बाळ सोपं आहे! आईला येऊन सांगायचं! तुमचे आईबाबा तुमच्यावर खूप विश्वास ठेवतात, त्यांच्या करता तुम्ही जे सांगाल ते खरं असत! ते एकदा चेक करतील कि तुम्ही खरं बोलताय कि नाही ते पण अंती जर तुम्ही खरे असाल तर ते तुम्हालाच मदत करतील. तेंव्हा बेधडक तुम्ही वाटेल  ते सगळं आई बाबाना सांगायचं,. पण त्याही आधी जर तुमच्यासोबत कहाणी होत असेल तर “जोरदार ओरडून लोकांना जमा करायचं, पोलीस असतील, शिक्षक असतील कुणीही त्यांच्या नावानी ओरडायचं जोरजोर्यात! ” 

“पण सगळ्यात महत्वाचं एवढं सगळं होत पर्यंत परक्या वक्तीवर विश्वास ठेवायचाच नाही!” अर्चना बोलती झाली!

हे ऐकून मुलींना धीर आला! त्यांचे शांत चेहेरे पाहून तिघीनींही रूम मधून काढता पाय घेतला आणि मुलींना एकटं सोडलं! पण नेहाला काय त्रास होतोय हे कळलंच नाही! 

दुसऱ्या दिवशी शाळेला सुटी होती आणि अर्चनाच्या घरी एक पार्टी त्यामुळे सगळे पुन्हा भेटणारच होते! 

पार्टी मध्ये नेहा सतत सावध होती, पण ती घरी होती! सगळे ओळखीचेच होते तरीही नेहा अशी का वागतेय म्हणून सगळे काळजीत पडले. तेवढ्यात नेहाच्या बाबांचा मित्र आला आणि नेहाच्या चेहऱ्याववरचे हावभाव बदलले! पण ते लोक अर्चनाच्या परिवाराच्या फार जवळचे होते तेंव्हा अर्चना मात्र बिनधास्त होती आणि रेवती आणि योगिनी सावध! 

सगळं काही सुरळीत सुरु असतांना, अचानक नेहा ओरडली, “मी नाही येणार तुमच्या जवळ! घाण वाटत तुम्ही हात लावल्यावर!”

हे ऐकून सगळे स्तब्ध झाले, अर्चना आणि तिच्या नवऱ्याला आपल्या मुलीचा गुन्हेगार सापडला होता. योगिनी आणि रेवतीच्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं होत. 

त्या व्यक्तीला घरातून हाकलून लावल्यावर अर्चनानी तिची चौकशी केली, डॉक्टरांकडून तीची नीट तपासणी करून घेतली. योगिनी आणि रेवतीच्या सतर्कते मुळे आज नेहाचं शारीरिक नुकसान तर टाळलं होत पण मानसिक रित्या ती अधिकच खंबीर झाली होती! 

आज खऱ्या अर्थाने राहुलला सुद्धा योगिनींच्या काळजीमागचं कारण कळलं होत! आपलं मुलं सुरक्षित नाही म्हणून काळजी करणारी आई त्याला मानसिक बळ देऊन त्याच सशक्तीकरण सुद्धा करू शकते ह्याबद्दल त्याला आपल्या बायकोचा अधिकच अभिमान वाटू लागला!!! रेवती आणि योगिनींच्या समुजूतदार पणाचे आणि सतर्कतेचे सगळ्यांनी कौतुकच केले! आणि सगळ्यात जास्त आनंद देणारी बाब म्हणजे अनुष्का योगिनींच्या अधिकच जवळ आली! आपल्या आईमध्ये तिला आपली सखी सापडली आणि खऱ्या अर्थाने योगिनी आणि अनुष्काची मैत्री झाली!!

error: Content is protected !!