गोठत चाललंय सारं.

गोठत चाललंय का
आपल्या आत होतं ते…
उष्म काहीतरी..
डोळे ओलावणरं
आतून ओढ जागवणारं..
एखादं मन ओळखणारं
एखादं मन जपणारं
एका हातातून दुसर्‍या हातात
सहज धावणारं ..
गोठत चाललंय की
गोठलंच आहे…?
कारण आता पडद्यावर टाहो
अन् पडद्यामागे एक विजयी हसू
पैश्यात न्हालेल,
सत्तेने माजलेलं
कुणाचा तरी पाय ओढून
पुढे गेलेलं….
कुठेतरी अंधार पसरवून
उजाडलेलं
निर्लज्जपणे चेहर्‍यावर
मिरवलेलं हसू…
आणि जग बघतंय, विव्हळतंय
रडतंय, मरतंय
अन् हे हसू आणखी
खुलतंय
कसंय ना!!
बाहेर वितळतंय सारंच
पण आत मात्र गोठतंय….. 

error: Content is protected !!