खिडकीतली सर
गच्च डोळे मिटूनमनाची दारं सताडउघडी ठेवूनदोन्ही हातांची ओंजळठेवून दे आकाशाखाली..आभाळ भरून आलं कीभरेल ओंजळहीकानावर कोसळतीलकाही आवाजअन् पापण्यांवर स्वार होतीलकाही थेंब,त्यांना जगून घेत्याच क्षणी …मनात घर करतील तेअन् वाहू लागतील,ओघळू लागतीलअगदी आत आत…अन् मग तुझ्या गंधातन्हाऊन निघतील…पुन्हा नव्याने बरसण्यासाठीतुझ्या खिडकीतली सरअशीच कोसळत राहतेचिंब भिजण्यासाठी..
Recent Comments